मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानचा डुप्लिकेट म्हणून अनेक कलाकार त्यांचे रिल्स बनवून फेम मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आजम अली अन्सारी नावाच्या तरुणाचा आहे. हा नेटकरी सलमानच्या गाण्यांवर आणि त्याच्या स्टाईलमध्ये रील बनवताना दिसतो.
इतकंच काय तर यापूर्वी शांतता भंग केल्याप्रकरणी अन्सारीवर कारवाई करून ठाकूर गंज पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. आता अन्सारी पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लखनऊ शहर आरपीएफनं रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अन्सारीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 'तेरे नाम' गाण्यावर अन्सारी रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवत होता.
आजम अन्सारी दालीबाग दालीगंज रेल्वे ओव्हरब्रिजवर सलमान खानच्या शैलीत 'तेरे नाम...' या गाण्यावर रेल्वे ट्रॅकवर शर्टलेस होऊन व्हिडिओ बनवत होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने गुन्हा दाखल केला. व्हिडिओमध्ये अन्सारी अभिनेता सलमानची पूर्णपणे कॉपी करताना दिसत आहे. आरपीएफ लखनऊचे निरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 147, 145 आणि 167 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
याआधी 8 मे रोजी शांतता भंग केल्याप्रकरणी अन्सारीवर कारवाई करून ठाकूरगंज पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी या जबरा फॅननं क्लॉक टॉवरवर गर्दीच्या मध्ये रील शर्टलेस केली. अन्सारी हा लखनऊचा रहिवासी आहे. तो सलमानचा इतका जबरदस्त चाहता आहे की तो 'भाई'च्या प्रत्येक स्टाईलची कॉपी करतो. यासाठी तो सलमानसारखे कपडे आणि ब्रेसलेटही घालतो. अन्सारीला इन्स्टाग्रामवर 29 हजारांहून अधिक युजर्स फॉलो करतात. अन्सारीची ही शैली अनेकांना आवडते.