Sanwaliya Seth Temple Donation: महाराष्ट्रात शिर्डीच्या साई मंदिराला भाविक भरभरुन दानं देतात. मागच्यावर्षी आलेल्या रिपोर्टनुसार साई मंदिराला मिळणाऱ्या डोनेशनमध्ये दरवर्षी 22 टक्क्यांनी वाढ होतेय. 5 वर्षाची आकडेवारी पाहता साई मंदिराला भाविकांनी 1 हजार 441 कोटी रुपयांचे डोनेशन दिलंय. तिरुपती बालाजी मंदिरालादेखील भाविक भरभरुन डोनेशन देतात. या मंदिरांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. पण असंही एक मंदिर आहे, जिथे भाविकांनी तब्बल 19.76 कोटी रुपयांचं दान दिलंय. कोणतं आहे हे मंदिर? जाणून घेऊया.
राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्याच्या श्री सांवलिया सेठ मंदिराची सध्या देशभरात चर्चा आहे. येथे भगवान श्रीकृष्णाला समर्पित एक मंदिर आहे. येथे दररोज मोठ्या श्रद्धेने हजारोंच्या संख्येत भाविक येत असतात. भगवान श्रीकृष्णाकडे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असतात. इच्छा पूर्ण झाली की नवस पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या मंदिराला भरभरुन देणगी देतात. या मंदिराचा मागच्या महिन्यातील देणगीचा आकडा समोर आलाय. त्यानुसार डोनेशनचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मंदिराला मिळालेल्या डोनेशनची किंमत इतकी मोठी होती की, कर्मचाऱ्यांना 5 टप्प्यात ती मोजावी लागली.यावरुन तुम्ही मिळालेल्या डोनेशनचा अंदाज लावू शकता.
राजस्थानच्या श्री सावलिया सेठ मंदिराच्या भंडारात यावेळी 19.76 कोटी रुपयांची देणगी गोळा झाली आहे. प्रत्येक महिनयातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला श्री सावलिया सेठ मंदिराची तिजोरी उघडली जाते. यावेळेस मंदिराची तिजोरी इतकी भरली होती की 5 टप्प्यात मोजणी करतानाही कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. समोर आलेल्या या रक्कमेने मंदिराचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराला गेल्या महिन्यात 15 कोटी 58 लाख 50 हजार 284 रुपयांची कॅश गोळा झाली होती. तर 3 कोटी 49 लाख 13 हजार 471 रुपये मनीऑर्डरने प्राप्त झाले. दरम्यान हे सारे रेकॉर्ड तोडून मंदिराला 19.76 कोटी रुपयांची देणगी मिळाली. या देणगीमध्ये 505 ग्रॅम सोने आणि 89 किलो चांदीचा समावेश आहे.
सावलिया सेठच्या दान मिळालेल्या देणगीची मोजणी श्री सावलिया मंदिर बोर्डाचे अध्यक्ष भेरुलाल गुर्जर आणि सदस्य अशोक कुमार शर्मा, श्रीलाल कुलर्मी, नायब तहसीलदार, संजय कुमार मण्डोवरा, ममतेश शर्मा यांनी केली. तसेच मंडळ प्रशासनिक अधिकारी घनश्याम जरवाल आणि लेहरीलाल गाडरी यांनी सहकार्य केलं.ही मोजणी सुरु असताना स्थानिक बॅंकेचे कर्मचारीदेखील उपस्थित होते.