अहमदाबाद : एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
कोणाचं सरकार येईल याबाबत देशातील जनतेमध्ये कमालीची उत्सूकता आहे. सट्टा बाजारात देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गुजरातमधील निवडणुकीवर जोरदार सट्टा लागला आहे. गुजरातमध्ये सट्टा बाजारात भाजप आणि काँग्रेससाठी 45/35 चा भाव सुरु आहे. ज्यामध्ये भाजपला 100 ते 103 जागा मिळतील, तर काँग्रेसला 78 ते 100 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
जर भाजपला 103 जागा मिळतात तर 1 लाखावर 35 हजार रुपये द्यावे लागतील. पण जर भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील तर एक लाख रुपये गमवावे लागणार आहेत.
काँग्रेसचा भाव सध्या 76 ते 78 वर चालला आहे. अशा परिस्थितीत जर काँग्रेसला 78 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तर एक लाखावर 35 हजार रुपये मिळतील. अशा प्रकारे सट्टा बाजारात देखील दोन्ही पक्षांवर जोरदारा सट्टा लावला जात आहे.