मुंबई : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अतिशय सोप्या पद्धतीने स्वस्त दरात वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. जाणकारांच्या मते वयक्तिक कर्ज खरे तर शेवटचा पर्याय म्हणून घ्यायला हवे. परतू तुम्ही वयक्तिक कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाच असेल तर, एसबीआय फक्त काही क्लिक्समध्ये तुम्हाला वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. तेसुद्धा घरबसल्या...
कमी व्याजदरावर मिळणार कर्ज
एसबीआय कमी व्याजदरावर कर्ज ऑफर करीत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या वयक्तिक कर्जाची सुरूवात 9.60 टक्क्यांपासून होत आहे. कर्जासाठी अप्लाय करायचे असल्यास किरकोळ प्रोसेसिंग शुल्क द्यावे लागेल.
Say 'Yes' to your dreams in just 4 clicks! Choose SBI Personal Loan and get it done with the best festive offers. Apply Now: https://t.co/BwaxSaM77i#SBI #GetItDoneWithSBI #PersonalLoan #FestiveOffer pic.twitter.com/wOamiXwAPU
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 13, 2021
किमान डॉक्युमेंटवर कर्ज
वयक्तिक कर्जासाठी अर्ज करायाचा असल्यास कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये तुमचे काम होऊ शकते. जर तुम्ही प्रीपेमेंट करीत असाल तर त्यावर कोणतीही पेनल्टी आकरण्यात येत नाही. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अप्लाय करून तुम्ही वयक्तिक कर्जासाठी अप्लाय करू शकता.