मुंबई : सोशल मीडियावर भेट मग मैत्री मग लिव्ह-इनची सुरुवात. त्यानंतर या नात्याला घरच्यांची मान्यता मिळाली. प्रेमकहाणी पूर्ण होण्याआधीच अशी घटना घडली आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले. एकाने या जगाचा निरोप घेतला तर दुसरा तुरुंगात पोहोचला. चित्रपटाची कथा मागे टाकणारी ही घटना बंगळुरूतील आहे. जिथे नवरीने होणाऱ्या पतीची हत्या करून बदला घेतला.
सोशल मीडियावर भेट
डॉ विकास राजन युक्रेनमधून एमबीबीएसची पदवी घेऊन परतले होते. चेन्नईतील रुग्णालयात प्रॅक्टिस केल्यानंतर तो बंगळुरूमध्ये नोकरीला लागला. येथे तो एका खाजगी रुग्णालयात काम करायचा आणि डॉक्टरांच्या अभ्यासाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा. डॉ राजन याची भेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एका मुलीसोबत झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि नंतर ते प्रेमात पडले. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आले. काही दिवसांनी दोघांनी लग्नाचा बेत आखला. त्यांच्या कुटुंबीयांनीही या नात्याला मान्यता दिली. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं.
इंस्टाग्रामवर नग्न फोटो पोस्ट
प्रतिभाने इंस्टाग्रामवर तिचे न्यूड फोटो पाहिले. ज्यानंतर तिला धक्काच बसला. याबाबत तिने डॉ. राजनला विचारले असता, त्याने सांगितले की एक बनावट आयडी तयार करण्यात आला होता आणि फोटो केवळ मनोरंजनासाठी पोस्ट केले गेले होते. प्रतिभाला याचा एवढा राग आला की तिने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
वराला मारहाण
10 सप्टेंबर रोजी तिने तिच्या मित्राच्या घरी भेटण्याचा बेत आखला आणि डॉ. राजनला तिच्यासोबत नेले. दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉक्टरवर फ्लोअर मॅपसह हल्ला केला. यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रतिभाने त्याला रुग्णालयात नेले. पण तो वाचू शकला नाही. कोमात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
खुनाच्या आरोपाखाली पोलीस कोठडी
प्रतिभाने डॉ राजनच्या भावाला मारामारीदरम्यान जखमी झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चौकशी केल्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रतिभा आणि तिचे तीन मित्र सुशील, गौतम आणि सुनील यांना अटक केली आहे.