Pitbull Dog Attack: नोएडा (Noida) आणि गाझियाबादमधील (Ghaziabad ) लिफ्टमध्ये पाळीव कुत्राच्या हल्ला (pet dog attack) झाल्याचा दोन घटना समोर आल्या होत्या. गाझियाबादमधील हाउसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका कुत्र्याने मुलाला चावा घेतला. हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कुत्र्याने मुलाला चावा घेतला, पण महिलेने तिच्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही केलं नाही, एवढंच नाही तर या घटनेबद्दल तिने माफीही मागतली नाही. तर दुसऱ्या घटनेत नोएडामधील एका निवासी सोसायटीच्या लिफ्टमध्ये मालकाने पकडलेला कुत्रा एका माणसाचा अंगावर धावून गेला.
या घटना ताज्या असतानाच पु्न्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे. एका उद्यानात खेळत असलेल्या 10 वर्षाच्या मुलावर पिटबुलने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहे. या 10 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यावर (10 year old boy ) 150 पेक्षा जास्त टाके (stitches) पडले आहेत. (Shocking Video pitbull pet dog attack 10 year old boy in ghaziabad video viral on social media)
ही घटना गाझियाबादमध्ये संजय नगरमध्ये घडली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Caught on CCTV) झाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्र्याचे मालक ललित त्यागी (Lalit Tyagi) हे उद्यानात कुत्र्याला फिरवत असताना. अचानक उद्यानात खेळत असलेल्या एका मुलावर या कुत्र्याने पळत जाऊन हल्ला केला.
3/9/22: A 10-year-old boy playing in the Ghaziabad park was attacked by a dog of Pitbull breed on last saturday, The child necessitating more than 100 stitches on his face. The kid is not able to talk.
CCTV footage surfaces. pic.twitter.com/QcZ0nYl3ZM— Muktanshu (@muktanshu) September 8, 2022
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्र्याचा मालक कुत्र्याला नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचा प्रयत्नाला यश मिळतं नव्हतं. मात्र या हल्ल्यात त्या चिमुकल्या मुलाच्या आयुष्यात कायमच्या जखमा सोडून गेला आहे.
धक्कादायक म्हणजे कोणताही परवाना किंवा नोंदणी न करता हा ललित त्यागी कुत्रा पाळत होते. या गुन्हासाठी त्यांना पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्यापैकी काहींनी कुत्रा-मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी आणण्यापूर्वी त्यांच्या तोंडावर टेप लावण्याची मागणी केली.