लग्नात मित्रच बनला वैरी, वरातीत बंदुकीतून झाडली गोळी, पाहा थरारक VIDEO

लग्नाच्या आनंदावर जीवाभावाच्या मित्राने घातलं विरजण, बंदुकीतून गोळी सुटली आणि.... 

Updated: Jun 24, 2022, 11:57 AM IST
लग्नात मित्रच बनला वैरी, वरातीत बंदुकीतून झाडली गोळी, पाहा थरारक VIDEO

नवी दिल्ली : लग्नात जीवाभावाचे मित्र मदत करतात आणि आनंदात सहभागी होतात. पण जीवाभावाच्या मित्रानेच घात केला. आनंदावर विरजण घातलं. बंदुकीतून गोळी सुटली आणि मित्राला लागली. या घटनेत मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यादरम्यान घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नवरदेवासोबत लग्नाचा आनंद साजरा केला जात आहे. त्यावेळी नवरदेवाच्या हातात रिवॉल्वर दिसतं. 

नवरदेव रिवॉल्वरमधून आकाशात फायरिंग करायला जातो. मात्र त्याचा नेम चुकतो आणि ती गोळी मित्राला लागते. जखमी मित्राला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.