Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या (Aftab Amin Poonawala) न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. लेकीच्या हत्येनंतर श्रद्धाचे वडील पहिल्यांदा समोर आले आहे. श्रद्धाच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनंतर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला...
'श्रद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आमचं कुटुंब दुःखी आहे. आम्ही ही गोष्ट कधीही विसरणार नाही. या सर्व गोष्टींमध्ये माझी प्रकृती देखील बिघडली. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांची तपासणी योग्य पद्धतीने सुरु. अगदी सुरुवातीस वसई येथील पोलीस स्टेशनमुळे मला त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी कारण जर तसं झालं नसतं तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती.'
'मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळण्यासाठी सर्वांचं सहकार्य तसंच न्याय व्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रुरतेने हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबातील आई-वडील आणि भाऊ यांची देखील सखोल चौकशी करुन त्यांना देखील शिक्षा झालीच पाहिजे. शिवाय या कटामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची देखील चौकशी करुन शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा करत आहे.'
वाचा | Shradha Walkar Case : क्रूरकर्मा आफताबला दिलासा नाहीच! कोठडीत 14 दिवसांची वाढ
मुलीच्या हत्येचं दुःख व्यक्त करताना विकास वालकर यांनी सुरुवातील भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आभार मानले. किरीट सोमय्या यांनी श्रद्धाच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. सोमय्या यांनी दिल्लीला जाण्यासाठी विकास वालकर यांच्या विमानाच्या तिकिट खर्चासोबत इतर खर्चाची देखील सोय केली. एवढंच नाही तर सोमय्या यांनी श्रद्धाच्या वडिलांना स्वतःची गाडी देखील दिली असल्याचं विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.