नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. यूपीएच्या घटक पक्षातील नेते या बैठकीला उपस्थित होते. यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार या बैठकीला उपस्थित होत्या.
निवडणुकींचे आकडे आपल्या विरोधात आहेत परंतू सर्व ताकदीनीशी लढण्याचा संदेश सोनिया गांधी यांनी बैठकीत दिला. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही संविधानाचे प्रमुख आहेत. देश आणि समाजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मीरा कुमार आणि गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बनवणे गरजेचे आहे. जातीयवादी आणि दोन समाजात तेढ निर्माण करणा-या विचारांच्या विश्वासावर देशाला सोडता येणार नसल्याचेही सोनिया गांधी बैठकीत म्हणाल्या.