अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद - उपराष्ट्रपती

भारताचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद आहे, असे म्हटले आहे. खैराताबाद येथील प्रसिद्ध गणेश मंडळात जाऊन नायडू यांनी सोमवारी पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 4, 2017, 04:56 PM IST
अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद - उपराष्ट्रपती

हैदराबाद : भारताचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद आहे, असे म्हटले आहे. खैराताबाद येथील प्रसिद्ध गणेश मंडळात जाऊन नायडू यांनी सोमवारी पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

खैराताबादचे गणेश मंडळ सुप्रसिद्ध आहे. इथे गणपती बाप्पांच्या ५० फुटांहूनही अधिक उंचीच्या भव्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. यावेळी बोलताना नायडू यांनी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची कशी सुरूवात केली. तसेच, ब्रिटीशांविरोधात लढण्यासाठी जनमत उभारण्यासाठी त्याचा कसा वापर केला याबातच्या आठवणींना उजाळा दिला.

देशाचे कल्याण आणि समृद्धी यासाठी आपण बाप्पांकडे आशिर्वाद मागितल्याचेही नायडू यांनी सांगितले.