मुंबई :Buy call on Coal India:रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यात अनेक शेअर्स काही प्रमाणात स्वस्त झाल्याने गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरत आहे. असाच एक शेअर मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी पब्लिक सेक्टर कंपनी कोल इंडिया (CoalIndia)च्या शेअरला आपल्या टॉप रिसर्च आयडियामध्ये सामिल केला आहे.
मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडियामध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत 245 रुपये ठेवण्यात आली आहे. 21 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 182 रुपये होती. गुंतवणूकदारांना 63 रुपये प्रति शेअरप्रमाणे 35 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात स्टॉकने आतापर्यंत 36 टक्क्यांहून अधिकची तेजी नोंदवली आहे.
कंपनीला ऑफटेक व्हॉल्यूम वाढ आणि किमतीत वाढ यामुळे पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा शेअर सुमारे 20 टक्क्यांनी वधारला आहे.
डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 29,086.35 कोटी रुपये होते. यामुळे मागील तिमाहीच्या तुलनेत 20.83 टक्के आणि गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 19.53 टक्के वाढ झाली आहे.
कंपनीचे एकूण उत्पन्न सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 24072.83 कोटी रुपये आणि सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत 24334.62 कोटी रुपये होते.