नवी दिल्ली : पत्रकार आणि कँमेरामन यांच्या सुरक्षितेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. त्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर सर्वांनी विचार केला पाहिजे. त्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. ते धोका पत्करुन काम करत आहेत, त्याकडे पाहणे गरजेचे आहे, हा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.
वाहिन्यांमध्ये ब्रेकींग न्यूजची स्पर्धा आहे.या स्पर्धेमुळे पत्रकार आणि कॅमेरामन यांची प्रचंड धावपळ होते.व्हिज्युअल्स घेण्यासाठी कॅमेरामन धोकादायकरित्या प्रवास करतात.हे पाहता वृत्तवाहिन्या व सरकारनेही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत या घटकांना सामावून घ्यावे,ही भूमिका सभागृहात मांडली.
— Supriya Sule (@supriya_sule) December 3, 2019
अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये ब्रेकिंग न्यूजची स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे पत्रकार आणि कॅमेरामन यांची प्रचंड धावपळ होते. व्हिज्युअल्स घेण्यासाठी कॅमेरामन धोकादायकरित्या प्रवास करतात. हे पाहता वृत्तवाहिन्या आणि सरकारनेही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत या घटकांना सामावून घेण्याची गरज आहे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या सभागृहात मांडली.
पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात आला.(1/2) pic.twitter.com/upTyBkrJj2
— Supriya Sule (@supriya_sule) December 3, 2019
I agree it’s a Breaking News but Please Take Care. Media Safety First. I am worried about the Driver and Cameraman. pic.twitter.com/ziUoxeTzIk
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहराच्या तासादरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रत गेल्या महिन्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली. त्यावेळी अनेक पत्रकारांची धावपळ पाहायला मिळाली. जीव धोक्यात घालून ते काम करत होते. दुचाकीवरुन चित्रण करताना अपघाचा धोका असतो. अशा परिस्थितीत ते काम करत असतात. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात आला. तो लोकसभेत मांडत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निदर्शनास आणून दिले. आता लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. pic.twitter.com/HrXTkaw39L— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019