बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवण्यात आलंय. हे नॉमिनेशन तामिळनाडूमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी केलंय. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या रुपात जगातील सर्वात मोठ्या स्वास्थ्य योजनेची सुरुवात केलीय. यासाठी त्यांना नोबल शांती पुरस्कार मिळायला हवा, असा उल्लेख या नॉमिनेशनमध्ये करण्यात आलाय. हे नॉमिनेशन सुंदरराजन यांच्या पतीनं केलंय. ते एका खाजगी युनिव्हर्सिटीत नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात जन्मलेल्या मुलांना भाजपच्या तामिळनाडू गटानं सोन्याच्या अंगठ्या वाटल्या होत्या. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष टी सुंदरराजन यांनी मध्य चेन्नईच्या पुरासैवक्कमस्थित सरकारी पीएचसीमध्ये नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी याच तमिलीसाई यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. डॉ. तमिलीसाई सुंदरराजन या पत्रकारांशी बोलत असताना त्यांना एका ऑटो रिक्षा चालकानं वाढत्या इंधन दरवाढीबद्दल विचारणा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या एका नेत्यानं या रिक्षा चालकाला जोरदार धक्काबुक्की करत हाकलून दिलं होतं.
श्रीमंत स्वीडीश उद्योगपती आणि डायनामाईटच्या अविष्काराचे जनक अल्फ्रेड नोबल यांनी या पुरस्कारांची स्थापना केली होती. हा पुरस्कार औषध, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य तसंच शांतता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रदान करण्यात येतो. सर्वात पहिला नोबल 1901 मध्ये नोबत यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी दिला गेला होता. अल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतीत 'इकोनॉमिक अॅवॉर्ड बँक ऑफ स्वीडन'कडून दिला जातो. याची सुरुवात 1968 मध्ये झाली होती.
आत्तापर्यंत भारतातून मदर टेरेसा, कैलाश सत्यार्थी यांना शातीसाठी नोबल पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. याशिवाय साहित्य क्षेत्रा रविंद्रनाथ टागोर, भौतिकशास्त्रात डॉक्टर सी व्ही रमन तर अर्थशास्त्रात अमर्त्य सेन यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलंय.