हेमंत सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री होतील - तेजस्वी यादव

आरजेडीच्या तेजस्वी यादव यांचा दावा

Updated: Dec 23, 2019, 03:34 PM IST
हेमंत सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री होतील - तेजस्वी यादव title=

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव होईल. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो. सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री होतील असा दावा आरजेडीच्या तेजस्वी यादव यांनी केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमोच्या आघाडीनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. काँग्रेस-झामुमो बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं दिसतं आहे.

गेल्या दोन वर्षांत भाजपची चार राज्यांमधून सत्ता गेली आहे. आता झारखंडमध्येल्या सत्तेलाही सुरूंग लागण्याची चिन्ह आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला असला तरी जागा कमालीच्या कमी झाल्या होत्या. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंडमधूनही सत्ता जाणार असल्याचं दिसतं आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३७ तर ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियनला (AJSU) ५ जागा मिळाल्या होत्या. तक JMM ला १९ आणि काँग्रेसला ६ तर बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा JVM ला ८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर JVM च्या ६ आमदारांनी  भाजपमध्ये प्रवेश केला होता.