Crime News : देशभरात चोरीच्या अनेक घटना घडत असतात. काही जण बक्कळ पैसे कमवण्यासाठी चोरी करतात, तर काही लोक दोन वेळच्या जेवणासाठी देखील चोरी करतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
कृष्णा नामक दुकानदार नामपल्ली पोलीस स्टेशन नजीक किराणा दुकान चालवतो. या त्याच्या दुकानातून एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) बॉटल चोरली होती. ही चोरी त्याने पाहिली होती, त्यामुळे त्याने त्या चिमुकल्याला पकडले होते. तसेच त्याला या चोरीचा जाब विचारला होता.
दुकानदाराने (Shopkeeper) चिमुकल्याला पकडल्यानंतर त्याचे हात पाय बांधले. आणि त्याला अमानुष (Child Beaten) मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीनंतर शेवटी दुकानदाराने त्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private part) मिर्चीची पावडर टाकली होती. या घटनेने चिमुकल्याची अवस्था खुपच बिकट झाली होती. तो वेदनेने किंचाळत होता. मात्र त्या दुकानदाराला त्याची कुठलीच दया माया आली नाही. आणि त्याने मुलासोबत अमानवीय कृत्य केले.
दुकानदाराने (Shopkeeper) हे अमानवीय कृत्य करत त्याची व्हिडिओ शुटींग देखील केली होती. त्यानंतर हाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या घटनेनंतर चिमुकल्याच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात दुकानदाराविरोधात (Shopkeeper) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानदाराला अटकेत घेत मुलाची सुटका केली.
दरम्यान ही घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या घटनेत आरोपी दुकानदाराला कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय. आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.