फक्त ८० रुपयांत 800 किमी धावणार ही इलेक्ट्रिक बाईक; Gravton Quanta ही स्वस्त इलेक्ट्रीक बाईक लॉंच

 भारतात नवी इलेक्ट्रिक बाईक लॉंच झाली आहे. हैद्राबादची स्टार्टअप कंपनी Gravton Motors ने Quanta बाईक लॉंच केली आहे

Updated: Jun 30, 2021, 12:29 PM IST
फक्त ८० रुपयांत 800 किमी धावणार ही इलेक्ट्रिक बाईक;  Gravton Quanta ही स्वस्त इलेक्ट्रीक बाईक लॉंच title=

नवी दिल्ली : भारतात नवी इलेक्ट्रिक बाईक लॉंच झाली आहे. हैद्राबादची स्टार्टअप कंपनी Gravton Motors ने Quanta बाईक लॉंच केली आहे. ही बाईक फक्त 80 रुपयांमध्ये 800 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.

किंमत किती?
Quanta या इलेक्ट्रिक बाईकची किंमत ९९ हजार रुपये इतकी आहे. कंपनीने २७ जून रोजी बाईकला शोकेस केले होते. कंपनी मर्यादित वापरकर्त्यांना Gravton चार्जिंग स्टेशन मोफत ऑफर देत आहे.

बॅटरी काढून करता येईल चार्ज
या बाईकमध्ये 3 kWh Li-ion बॅटरी लावली आहे.  ही बॅटरी तुम्ही बाईकमधून काढून चार्ज करू शकता. पुर्ण चार्ज केल्यास ही बाईक 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या बाईकमध्ये एकावेळी २ बॅटरी कॅरी करता येतील. एक बॅटरीला चार्ज होण्यास ३ तासांचा अवधी लागतो.  दोन्ही बॅटरी सोबत असल्यास साधारण 300 किमी पर्यंत ही बाईक धावू शकते.

शिवाय या बॅटरी चार्ज करण्यासाठी कमी विज लागते. त्यामुळे माफक विज युनिट्समध्ये बाईक जास्त किमीचा टप्पा गाठू शकते.

बुकिंग करा
तुम्हाला या बाईकच्या बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.  https://www.gravtonmotors.com/ 

मोटरची क्षमता
इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3KW proprietary BLDC मोटर लावली आहे. बाईक ७० किलोमीटर प्रति तासाच्या गतीने धावू शकते.  मोटार 170Nm इतके कमाल टॉर्क जनरेट करते.