नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते काही उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबतही पंतप्रधान मोदी यांची एक बैठक असणार आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीसुद्धा ते भेट घेतील. याव्यतिरिक्त क्वाड प्रमुखांच्या शिखर संमेलनात सहभागी होण्यासोबतच ते United Nations General Assembly मध्ये संबोधनपर भाषण करतीस असंही म्हटलं जात आहे. (pm modi us visit)
अमेरिका दौरा सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी फावल्या वेळात काही महत्त्वाची कामं केली. अमेरिकेच्या प्रवासाला निघालं असता या प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळात त्यांनी अनेक फाईल तपासत, त्यातील तपशील नजरेखालून घातला. अनेक कागदपत्रांवर नजरस दिली. थोडक्यात काय, सर वेळेचा सदुपयोग केला. मोदींनी केलेलं हे अभ्यासपूर्ण काम पाहून साऱ्या जगाच्याच नजरा वळल्या.
खुद्द पंतप्रधानांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट करत ही माहिती देण्यात आली. नव्यानंच समाविष्ट करण्यात आलेल्या बोईंग 777 VVIP या एअर इंडियाच्या विमानानं पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी जवळपास 11 वाजता नवी दिल्लीहून अमेरिकेसाठी रवाना झाले. वॉशिंग्टन येथील जॉईंट बेस अँड्र्यू इथं भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ते पोहोचले.
कोरोनाचा कहर सुरु झाल्यास पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान, त्यांचे सर्व कार्यक्रम ठरले असून, इथं ते विविध देशांच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात पंतप्रधानांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.