Tigress T-123 Entered The University Campus: मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने आता सिमेंटच्या जंगलात जंगली प्राण्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. अशातच आता मध्य प्रदेशमधून (Madhya Paradesh News) धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अनेकदा रस्त्यावरून जाताना लोकांना वाघ दिसतो. गेल्या दिवशी एका खासगी विद्यापीठात (University Campus) एका वाघिणीच्या (Tigress T-123) प्रवेशामुळे गोंधळ उडाला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.
कालियासोत धरणाजवळ असलेल्या जागरण लेकसिटी विद्यापीठात शनिवारी पहाटे नेहमीप्रमाणे कर्मचारी विद्यापीठ परिसरात आले. त्यावेळी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी वाघिणी थेट कुलगुरूंच्या केबिनबाहेर पोहोचली. वाघिणीला पाहून अनेकांच्या काय करावं आणि काय करू नये, असं झालं. कोण विद्यार्थ्यांच्या बेडखाली लपलं तर कोणी कपाटावर जाऊल लपलं. त्यानंतर तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली. त्यानंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाल्यानंतर काही वेळातच वाघीण सीमा ओलांडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. विद्यापीठीच्या बाजूला जंगल असल्याने अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. सुरक्षेसाठी कॅम्पसच्या चहूबाजूंनी तारांचे कुंपण आहे. मात्र, अनेक ठिकाणी तारांचे कुंपण तुटल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे वाघिणी कॅम्पसमध्ये घुसली, असंही समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलंय.
आणखी वाचा - PUBG मुळे मानसिक संतुलन बिघडलं! तरुणाने आई-बापाला संपवलं, दूधवाल्यामुळे झाला खुलासा
भोपाल ब्रेकिंग, कलियासोत में जागरण लेकसिटी के ऑफिस के पास जा पहुंचा #बाघ तड़के सुबह
लगातार बाघ की मूवमेंट बढ़ती हुई
पास में ही गार्ड सोया हुआ था, जान बचाकर भागा वहां से pic.twitter.com/6pHzCCKS11
— Laxmi Narayan Malviya (@LNMalviya6) August 5, 2023
दरम्यान, खुलेआम जर वाघिण कुलगुरूंच्या केबिनजवळ जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विचारला आहे. वाघिणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.