नवी दिल्ली : देशात कच्चा तेलाच्या वाढत्या दरांविरोधात आज पंजाबमध्ये भारतीय किसान यूनियनने ट्रॅक्टर रॅली काढली होती. डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात 1 हजारहून अधिक शेतकरी या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी सरकारला त्यांचा ट्रॅक्टर सोपवत असल्याचं म्हटलं. भारतीय किसान यूनियनने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.
Bharatiya Kisan Union held tractor rally against price hike of petrol and diesel in Samrala #Punjab pic.twitter.com/rwnzmo9vYd
— ANI (@ANI) May 29, 2018
युनियनचे नेते देविंदर शर्मा यांनी म्हटलं की, "इतकं महाग डिझेल खरेदी करुन शेतकरी शेती नाही करु शकत. ट्रॅक्टर चालवणं आता शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सोपवण्यासाठी जात आहे. लुधियानामध्ये डिझेल 69.46 रुपये प्रती लीटर आहे.