Salary Incriment यंदा कमी झालंय, चिंता करु नका 2023 मध्ये पगारदार होणार मालामाल!

ज्यांचं Salary Incriment चांगलं झालं नाही, त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Aug 16, 2022, 04:33 PM IST
Salary Incriment यंदा कमी झालंय, चिंता करु नका 2023 मध्ये पगारदार होणार मालामाल! title=
trending news salary hike in 2023 firms in india expected to give 10 percent hike in marathi

Salary Hike in 2023 - प्रत्येक नोकरी करणारा कायम मार्च महिन्याची वाट पाहत असतो. कारण या महिन्यामध्ये आपल्याला Salary Hike मिळत असते. यावर्षीचं सगळ्यांचं इंक्रीमेंट झालं आहे. आता सगळे वाट पाहत आहेत ते 2023मधील इंक्रीमेंटची. ज्यांचं Salary Incriment चांगलं झालं नाही, त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

देशातील प्रत्येक कंपनी 2023मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देऊ शकतं. एका अहवालानुसार कंपन्या थोड्या कठीण प्रसंगातून जात आहे. मात्र 2023 मध्ये या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के पगारवाढ (Salary Incriment) करु शकतं. (trending news salary hike in 2023 firms in india expected to give 10 percent hike in marathi)

सॅलरी इंक्रीमेंटचं बजेट वाढवलं

जागतिक सल्लागार, ब्रोकिंग आणि सोल्यूशन सेवा देणारी विलिस टॉवर्स वॉटसन यांच्या अहवालानुसार, भारतातील कंपन्या 2023मध्ये 10 टक्के वेतन वाढीची व्यवस्था करत आहेत. गेल्या वर्षी प्रत्यक्ष वेतनवाझ 9.5 टक्के झाली होती. या अहवालानुसार भारतातील निम्म्याहून अधिक (58 टक्के) नियोक्त्यांनी चालू आर्थिक वर्षांपेक्षा जास्त पगारवाढीसाठी बजेट मांडलं आहे. 

25 टक्के बजेट बदलेलं नाही

24.4 टक्के बजेटमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. अहवालातनुसार 2021-22 च्या तुलनेत केवळ 5.4 टक्के बजेट कमी केले गेलं आहे. या रिपोर्टनुसार आशिया पॅसिफिक (APAC) क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ ही भारतात होणार आहे. तर चीनमध्ये 6 टक्के, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये 4 टक्के पागरवाढ होणार आहे. 168 देशांमध्ये एप्रिल आणि मे 2022 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तर या सर्वेक्षणात भारतातील 590 कंपन्यांचा सहभाग होता.