Couple Romantic Pre Wedding Photoshoot viral video : आजकाल एक वेगळाच ट्रेंड आला आहे. ज्यात प्रत्येक क्षणाचं फोटोशूट केलं जातं आहे. पूर्वी फक्त लग्न आणि काही खास समारंभाचे फोटो काढण्याची पद्धत होती. मात्र जणू काही फोटोशूट क्षेत्रात नवी क्रांतीच आली. अन् आज जो तो प्रत्येक क्षणाचे फोटोशूट करत फिरतो. न्यूड फोटोशूट (Nude photo shoot), बेबी बंप फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) अगदी नुकतच घटस्फोट फोटोशूटही (Trending Divorce Photoshoot) एका अभिनेत्रीने केलं. त्यानंतर सर्वत्र तिचंच चर्चा सुरु आहे. आता अजून एका फोटोशूटचा व्हिडीओ सोशल (viral video) मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Trending Photoshoot)
प्री वेडिंग फोटोचं नवीन ट्रेंड आलं आहे. लग्नापूर्वी नवरा बायको रोमाँटिक आणि हटके फोटोशूट करुन घेतात. या फोटोशूटचा व्हिडीओ लग्नाचा दिवशी लग्नमंडपात दाखवला जातो. प्रत्येकाला वाटतं आपलं लग्न इतरांपेक्षा हटके असावं. आपल्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली पाहिजे. अगदी मग लग्नातील कपड्यांपासून, डान्स आणि फोटोशूपर्यंत...
एका कपलने हटके म्हणजे काय केलं माहिती आहे का, या तरुण तरुणीने चक्क नाल्यामध्ये आणि कचऱ्यामध्ये रोमान्स करताना दिसत आहे. या कपलचा रोमान्सवाला नाल्यातील फोटोशूट सोशल मीडिया यूजर्स हैराण परेशान झाले आहेत. हा फोटोशूट पाहून प्रत्येक जण डोक्याला हात मारून घेत आहे. किती हा गलिच्छपणा असा प्रश्न यूजर्स विचारत आहेत. (trending video Couple Romantic Pre Wedding Photoshoot at drainage kiss and hug video viral on Social media)
एका फोटोमध्ये तर नाल्यातील कचऱ्याचा साम्राज्यात तरुण तरुणी एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे फोटोशूट फेक असल्याचं काही जण म्हणतं आहेत. हे फोटो AI मार्फत बनवल्याचं बोलं जातं आहे. मात्र या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर AI वापर करुन अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर गरीब असतील तर कसे दिसतील? जीमला जात असतील तर कसे दिसतील अगदी स्त्रीच्या वेशात ते कसे दिसतील हे दाखविण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून मुकेश अंबानीपर्यंत सगळ्यांचे फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर withgokul नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.