नवी दिल्ली : ESIC covid 19 Relif Scheme जगभरात कोविड 19 च्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एम्प्लॉय स्टेट इंश्योरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC ने नुकतेच कोविड रिलिफ योजनेला मंजूरी दिली आहे.
य़ा योजने अंतर्गत ESIC कार्ड होल्डरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ESIC च्या अंतर्गत येणाऱ्या विमाधारक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ईएसआईसीतर्फे त्याच्या कुंटूबियांना कमीत कमी 1800 रुपये प्रति महिना पेंशन मिळेल. श्रम मंत्रालयाने या कोविड रिलिफ स्कीमला नोटीफाई केले आहे.
ESIC कोविड 19 रिलिफ स्कीम
ESIC मध्ये इंश्योरन्स कमिशनर एम के शर्मा म्हणतात की, या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या कुटूंबियांना मृत कर्मचाऱ्यांचा पगार मिळेल. म्हणजेच ईसआईसी मध्ये योगदान देणारे व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराच्या 90 टक्के पगार देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
या योजनेच्या पात्रतेमध्ये कोणत्याही कंपनी कर्मचाऱ्याने 1 वर्षाच्या आत कमीत कमी 70 दिवस ESICमध्ये योगदान दिलेले असेल. अशा कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना या योजनेचा लाभ मिळेल. याशिवाय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याआधी 3 महिने तो कोणत्याही कंपनीचा कर्मचारी असणे गरजेचे असते. त्या दरम्यान त्याला कोरोना झाला आणि त्याकारणाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत कुटूंबियांना दरमहा मानधन मिळू शकते.