नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
अर्थमंत्री अरूण जेटली आज देशाचा ८८ वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सकाळी ११ वाजता जेटली आपला पिटारा खोलणार आहेत. यात सामान्य माणसासह सर्व क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी मीडियाशी बोलताना कसा असणार अर्थसंकल्प याबाबत संकेत दिले आहेत. शुक्ल यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की हा अर्थसंकल्प खूप चांगला असणार आहे. यात सामान्य माणसाला अनेक लाभ मिळणार आहेत.
अर्थमंत्री अरूण जेटली यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण अर्थसंकल्प आहे. यात राजकोषीय लक्ष्यसह शेती क्षेत्रातील संकट, रोजगार आणि आर्थिक वृद्धीला गती देण्याची कसोटी त्यांच्यासमोर असणार आहे. पुढील काही महिन्यात आठ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील तीन प्रमुख राज्यात भाजपचे सरकार आहेत, तसेच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत.
अर्थसंकल्पात नवीन ग्रामीण योजना येऊ शकतात. मनरेगा, ग्रामीण गृह योजना, सिंचन प्रकल्प, पीक विमा सारख्या योजनांमध्ये निधी वाढविला जाऊ शकतो. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागात सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे जेटली अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.
लघु उद्योगांना अधिक सवलती देण्याची शक्यता आहे. याला क्षेत्रातील उद्योजक हे भाजपचे प्रमुख समर्थक आहेत. जीएसटीमुळे या क्षेत्राला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यात सवलती देऊ दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
It will be a good budget. It will be for the benefit of the common people: Shiv Pratap Shukla, MoS, Finance #UnionBudget2018 #Delhi pic.twitter.com/HAjqTT2PxR
— ANI (@ANI) February 1, 2018
असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
बदलू शकतो टॅक्स स्लॅब
0-3 लाख 0%
3-5 लाख 5%
5-7.5 लाख 10%
7.5-10 लाख 20%
10 लाखांच्या वर 30%
अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल होऊ शकतो.
१० टक्के टॅक्स स्लॅबचे होऊ शकते पुनरागमन
सध्या ५ टक्के आणि २० टक्के टॅक्स स्लॅब आहे.
८० सी मध्ये सूट १.५ लाखांवरून वाढून २ लाख होणार आहे.
टॅक्स सूट ही २.५ लाखांवरून ३ लाख होण्याची शक्यता