Uttar Pradesh Crime News : एकादा पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले की त्यातुन सुटका होणे कठीण असे अनेक जण म्हणतात. मात्र, याचा प्रत्यक्षात अनुभव उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या आयुष्यातील 30 वर्ष जेल मध्ये काढावी लागली आहेत. अखेरीस कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली. 30 वर्ष न केलेल्या चुकीची त्याला विनाकारण शिक्षा भोगावी लागली.
उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील छिबरामऊ जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला आहे. हरदोई कारागृहात बंद असलेल्या या व्यक्तीची निर्दोष सुटका करण्याचे आदेश कन्नौज न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. गरिबी आणि परिस्थितीमुळे हतबल असलेल्या व्यक्तींना अन्याय सहन करावा लागतोच हे या प्रकारामुळे अधोरेखित झाले आहे. कोर्टात आपली बाजू माडण्यांसाठी वकिल करण्यासाठी देखील या व्यक्तीकडे पैसे नव्हते. यामुळे तब्बल 30 वर्ष त्याल तुरुंगात काढावी लागली आहेत. मात्र, शेवटी या हतबल व्यक्तीला मदत मिळाली. 30 वर्षांपासून जेलमध्ये असलेला हा व्यक्ती कोर्टात अवघ्या 15 दिवसांत निर्दोष सिद्ध झाला आहे.
विनोद उर्फ कुलिया असे 30 वर्ष तुरंगात काढणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. फिरोजाबादच्या मोहल्ला कंबोहनमध्ये राहणाऱ्या राजेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 7 ऑगस्ट 1991 रोजी राजेंद्र सिंह यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी विनोद यांना अटक झाली होती.
राजेंद्र सिंह यांनी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चिब्रामाळ येथील बाजारिया येथे काही लोकांनी राजेंद्र सिंह यांच्यजवळील दागिन्यांनी भरलेली बॅग लुटल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी विनोद उर्फ कुलिया, रामा उर्फ रमाशंकर, अजय दीक्षित, रामप्रकाश मिश्रा, उमाकांत मिश्रा, विद्याधर, नरेश दुबे आणि सतीश चंद्र यांना अटक करण्यात आली होती.
सर्व आरोपींनी वकिलांच्या मदतीने न्यायालयात आपली बाजू मांडून सुटका करुन घेतली. मात्र, विनोद यांच्याकडे वकिल करण्यासाठी पैसे नव्हते. तर, पोलिसांनी देखील ते निर्दोष असताना त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले नाहीत. तुरुंगात असताना विनोद यांच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी त्यांना 15 दिवसांच्या पेरोलवर सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांना तुरुंगात बंद करण्यात आले. अटक झाली तेव्हा विनोद तरुण होते. मात्र, आता त्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. विनोद यांचे संपूर्ण तारुण्य जेलमध्ये गेले आहे. त्यांचे केस आणि दाढी पांढरी झाली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. विनोद यांचे लग्न झाले नाही. ते तुरुंगात असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांना कायदेशीर मदतीबाबात महिती मिळाली. यांनतर त्यांनी आपल्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा दिला. 30 वर्षांनंतर न केलेल्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.