Viral Video : मणिपूरमध्ये (Manipur) जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली त्यानंतर या महिलांवर सामुहिक अत्याचार (Gangrape) करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ तब्बल 79 दिवसांनी व्हायरल झाला आणि देशभरात एकच संतापाची लाट पसरली. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभेतही मणिपूरच्या मुद्दयावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता सोशल मीडियावर (Social Media) असाच आणखी एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर आरोपींनी सामुहिक अत्याचार करत त्या घटनेचा व्हिडिओ बनवला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तीन नराधमांना अटक (Accused Arrest) केली आहे.
गावातील एका तरुणीने लग्न करण्याचं आमिष दाखवत बलात्कार (Rape) केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. आरोपीने पीडित मुलीला गुंगीचा पदार्थ खायला घालून तिला जंगलात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान गावातील आणखी चार जण आले आणि त्या मुलीला मारहाण केली. त्या नराधमानांनी विवस्त्र अवस्थेतच तिचा व्हिडिओ बनवला. नंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावात राहाणाऱ्या शाकीर नावाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाचा जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर दोन वर्ष बलात्कार केला. घटनेच्या दिवशी शाकीरने पीडित मुलीला खोटं सांगून जंगलात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
याचवेळी गावात राहाणारे शोएब, गुलजार,पप्पू आणि आणखी एक अज्ञात तरुण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी विवस्त्र अवस्थेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ बनवत तिला मारहाण केली. शाकीर पीडित मुलीला तिथेच सोडून पळून गेला. आरोपींनी मुलीचे कपडे घेतले, ती त्यांना कपडे परत देण्याची विनंती करत होती, पण आरोपींनी तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष केलं. यातल्या शोएब नावाच्या आरोपीने आपल्या मोबाईलवरुन हा व्हिडिओ व्हायरल केला.
हा व्हिडिओ पीडित मुलीच्या भावापर्यंत पोहोचला. त्याने बहिणाला व्हिडिओबाबत विचारल्यानंतर तीने संपूर्ण घटना सांगितली. याबाबत शाकीरला जाब विचारला असता त्याने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणीच गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.