नोएडा : यूपीच्या नोएडातील बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कोरोना-संक्रमित रूग्णांचे नातेवाईक नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ दीपक ओहरीच्या पाया पडताना दिसले. मात्र सीएमओने या महिलांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली. आता बातमी येत आहे की, रेमडेसिविरसाठी सीएमओच्या पाया पडणाऱ्या रिंके देवीला कोणाकडून ही मदत मिळाली नाही. इंजेक्शन न मिळाल्यामुळे तिच्या 24 वर्षीय तरुण मुलाचा सायंकाळी उशिरा मृत्यू झाला आहे.
नोएडा येथील रहिवासी रिंकी देवीचा एकुलत्या एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मुलावर सेक्टर 51 मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी डॉक्टरांनी तिला रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले, परंतु ते कोठेही न मिळाल्यानंतर ती, मदतीसाठी नोएडाच्या सीएमओकडे पोहोचली.
सीएमओला पाहून रिंकी देवी त्यांच्या पाया पडली आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी विनवणी करण्यास सुरवात केली. यावेळी त्यांच्या सोबत कोरोना-संक्रमित रुग्णाचे इतर कुटूंबिय देखील होते. त्यावेळी सीएमओ दीपक ओहरी त्यांच्या ऑफिसमध्ये आल्याबद्दंल त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी देत होते.
#WATCH Noida | Families of #COVID19 patients touch the feet of Chief Medical Officer (CMO) Deepak Ohri, requesting him that they be provided with Remdesivir.
(27.04.2021) pic.twitter.com/zX4ne027Mr
— ANI UP (@ANINewsUP) April 28, 2021
रिपोर्टनुसार सीएमओला इतकी विनंती करुनही रिंकी देवीच्या मुलाला रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळू शकले नाही. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती रिकाम्या हाताने सेक्टर -51 मधील रुग्णालयात पोहोचली, पण तोपर्यंत तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
रिंकी देवी मागील तीन दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठी फिरत होती आणि तिला नोएडाच्या सीएमओकडून गैरवर्तन आणि धमकीशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही.
रिंकी देवी सीएमओच्या कार्यालयात गेली होती तेव्हा तेथे रेमेडसवीर इंजेक्शनसाठी इतर सात-आठ जणां देखील होते. हे सर्व लोकं रेमडेसिविरचा शोध घेत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, तिन्ही महिला सीएमओ दीपक ओहरी यांच्याकडे हात जोडून इंजेक्शनसाठी त्यांच्या पाया पडत होती.
त्या महिलेने पत्रकारांना सांगितले की, "आम्ही येथे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आलो होतो. तर इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर ते दिली जाईल असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यावर मी कार्यालयात येईन असे म्हटल्यावर मला सांगण्यात आले की, मी परत आल्यास मला तुरूंगात पाठवले जाईल."