सूनेला बराच वेळ लागायचा आंघोळ करायला, एक दिवस बाथरुममध्ये सासू डोकावली अन् समोरचं दृश्य पाहून...

एक विचित्र घटना समोर आलीय. सूनेला आंघोळीसाठी जास्त वेळ लागतो, हे सासू सासरे यांना लग्नापूर्वीच सांगण्यात आलं होतं. पण एकादिवशी जेव्हा सासूने बाथरुममध्ये डोकावलं तर...

नेहा चौधरी | Updated: Dec 18, 2024, 08:30 PM IST
सूनेला बराच वेळ लागायचा आंघोळ करायला, एक दिवस बाथरुममध्ये सासू डोकावली अन् समोरचं दृश्य पाहून... title=

आयुष्यात प्रत्येकाला वेगवेगळी सवय असते. कोणाला जास्त वेळ झोपण्याची तर कोणाला भरपूर पाणी प्यायची तर कोणाला आंघोळीसाठी जास्त वेळ लागतो तर कोणाची लवकरच होते. अगदी कोणाला जेवायलाही खूप वेळ लागतो. लहानपणापासून असलेल्या  या सवयी मोठ्यापणी कितीही प्रयत्न केल्या तरी जात नसतात. एका मुलीचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासरच्या मंडळीला पूर्वी कल्पना देण्यात आली होती की, मुलीला आंघोळाला वेळ लागतो. सासरे मंडळीने तिची ही सवय असल्याने काही म्हटलं नाही. पण एक दिवस तिला बाथरुममधून आंघोळ करायला बाहेर येण्यास उशीर होत असल्याच पाहून सासूने त्याच कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. (viral news daughter in law used to take a long time to take a bath one day the mother in law peeked into the bathroom)

काय आहे नेमकं कारण?

उत्तर प्रदेशच्या संभळमधील हयातनगरतील धक्कादायक प्रकरण समोर आलंय. हयातनगरच्या दातवली मार्गावरील एका तरुणाचं सात महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. त्याचा बायकोला आंघोळ करायला खूप वेळ लागतो, असं त्याला सासरच्या मंडळींना सांगण्यात आलंय. एक दिवस सून आंघोळ करायला बाथरुममध्ये गेली. त्यानंतर सासू सासरे आणि नवरा कामानिमित्त घराबाहेर गेले. बाहेरची कामं झाल्यावर सासू काही वेळातच घरी आली. तिला वाटलं तेवढ्यात तर सुनेची आंघोळ नक्कीच झाली असेल. पण ती घरात येताच सून कुठेही दिसत नव्हती. सून अजूनही आंघोळ करतेय असं सासूला वाटलं. त्यामुळे सासू बाथरुममध्ये जाऊन पाहते तर काय तिथे कोणीही नव्हतं. 

सासूने घरात सूनेला शोधलं ती कुठेही दिसली नाही. त्यानंतर सासूला समजलं की, घरातील दागिने, पैसेही गायब झाले आहेत. सून घरातील दागिने, पैसे घेऊन पळाली होती. हे पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. सूनेने सासरच्या घरातून तीन लाख आणि लाखो रुपयाचे दागिने चोरले आणि ती घरातून पळून गेली. सासूने मुलाला माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांनी सूनेबद्दल तक्रार केली.