दचकलात ना! चित्रात जे वाटतंय तसं नाही, 'ही' आहे या अजब फोटोमागची कहाणी

Optical Illusion: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातून सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात जे खासकरून तुम्हाला बुचकळ्यात पाडतात. हीच खरी इल्यूजनची मजा असते. सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 13, 2023, 06:21 PM IST
दचकलात ना! चित्रात जे वाटतंय तसं नाही, 'ही' आहे या अजब फोटोमागची कहाणी title=
viral tree roots photo made of man goes viral on instagram (Photo : conceptsjpeg | Instagram)

Viral Tree Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. अनेकदा असे अनेक फोटो असतात जे पाहून आपण पुर्णत: चक्रावून जातो. सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल. तेव्हा चला तर पाहूया की या फोटोत असं आहे तरी काय? यावेळी या फोटोतून तुम्हाला मानवाच्या शरीराचे काहीतरी दिसत असेलच परंतु थांबा तशी काही आकृती तुम्हाला दिसणं अगदी शक्यच आहे. परंतु ही कोणी मानवाची आकृती नाही किंवा त्याचे शरीर नाही.

त्यातून ही कोणती मम्मीही नाही. हे झाडं आहे आणि ही झाडांची मुळं आहेत. तुम्हाला या झाडांच्या मुळांनी चांगलंच गडवलं आहे. या झाडांच्या मुळांचा आकार पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सध्या या फोटोची जोरात चर्चाही रंगलेली दिसते आहे. 

यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका फोटोची. हा फोटो इन्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. सोबतच @conceptsjpeg या युझरनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यातून यावेळी या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या फोटोखाली नेटकऱ्यांच्याही भन्नाट कमेंट्स येताना दिसत आहेत. तुम्हाला जाणून धक्का बसेल परंतु यावेळी या फोटो पाहून सगळ्यांचेच डोकं चक्रावले आहे. भास होणं हे काही नवीन नाही त्यातून भास हे कशाचेही कधीही होऊ शकतात. यावेळी फक्त चर्चा आहे ती म्हणजे या फोटोतून आपल्याला होणाऱ्या भासाची. त्यातून जर का आपल्याला काहीतरी वेगळेच दिसले तर आपलाही गोंधळ आपोआपच होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की यावेळी हा फोचो एवढा का बरं चर्चेत आहे.

हेही वाचा : 'हा पाहा देव'; फुलांचा वर्षाव अन्... लिटिल चॅम्प्सचे प्रेम पाहून अशोक मामा भावूक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुंम्ही या व्हायरल होणाऱ्या फोटोत पाहू शकता की एक महिला झोपलेली वाटते आहे. तिचे शरीर बांधून ठेवल्याप्रमाणे दिसते आहे. यावेळी म्हणूनच हा फोटो लोकांना चकीत करून सोडतो आहे. यावेळी नेटकऱ्यांवरही ही गुगली पडली आहे. यावेळी या फोटोमध्ये महिलेचे हात, पाय, डोकं, छाती, संपुर्ण शरीर दिसतं आहे. त्यातून सध्या हा फोटो तुम्हाला थोडासा दचकवूही शकतो. अनेकांनी म्हटलंय की, ही देवाची रचना आहे. तर काहींनी म्हटलंय की, हे शक्य नाही. तर एकानं म्हटलंय की, आम्ही याला घाबरणार नाही.