Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!

Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.

Updated: Mar 18, 2023, 04:16 PM IST
Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल! title=
Trending Video Of Girl

Girl Child Viral Video: मुलगी आणि बापाचं (Daughter and father) नात अतूट असतं. फक्त  मुलगी आपल्या बापाला समजून घेते असं म्हटलं जातं. त्यामुळे मुलीच्या भविष्याबाबत बाप अधिक जागृत असतो. अशातच मुलगी आणि बापाचं नातं समजून सांगणारा एक व्हिडिओ (Trending Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ (Social Media Viral Video) अनेकदा व्हायरल होतात. त्यातील एका लहान चिमुकलीचा हा व्हिडिओ (Girl Child Video) नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलाय.

VIDEO मध्ये काय आहे ?

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी आणि तिच्या वडिलांमध्ये अभ्यासाबाबत (Girl Child Education) संभाषण ऐकायला मिळतंय. मुलीचे वडील विचारतात,  तिने अभ्यास केला तर कोणाला फायदा होईल? असा सवाल वडिलांनी विचारला. त्यावेळी तिने तुमचा फायदा आहे, असं मुलीने थेट उत्तर दिलं.

आणखी वाचा - मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...

कॅमेरा सुरू असल्याचं पाहताच मुलगी लाजली. मी जेव्हा मोठी होईल, तेव्हा मी पैसे तुम्हाला देईल. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल, असं मुलगी म्हणते. मी कितीही मोठी झाले तरी तुमच्यासाठी लहानच राहिल, असं ती चिमुकली मुलगी म्हणताना दिसत आहे. तुला मोठं होऊन डॉक्टर नाही का बनायचं? असा सवाल वडिलांनी केला. त्यावर हो बनायचंय, असं उत्तर मुलीने दिलंय.

पाहा Video - 

दरम्यान, रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. इन्स्टाग्रामवर uniquemathsir नावाच्या अकाऊंटच्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Viral Video) शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर जोरदार टीका केली. तर काहींनी मुलीच्या बेधकपणाचं कौतूक केलंय.