बँकेत लॅपटॉपवर काम करता करता बेशुद्ध पडला, काही सेकंदातच मृत्यूने गाठलं... मृत्यूचा Video

Viral Video : बँकेत लॅपटॉपवर काम करत असताना बसल्या जागेवरच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बँकत लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्हीत मृत्यूची ही घटना कैद झालीय. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

राजीव कासले | Updated: Jun 26, 2024, 08:53 PM IST
 बँकेत लॅपटॉपवर काम करता करता बेशुद्ध पडला, काही सेकंदातच मृत्यूने गाठलं... मृत्यूचा Video title=

Viral Video : बँकेत लॅपटॉपवर काम करत खुर्चीवर बसलेला एक कर्मचारी जागेवरच बेशुद्ध पडला आणि अवघ्या काही सेकंदातच त्याला मृत्यूने गाठलं. मृत्यूची ही घटना बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. प्राथमिक तपासणीत हार्टअटॅकमुळे (Heart Attack) या बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. उत्तर प्रदेशमधल्या महोबा (Mahoba) जिल्ह्यातील एका खासगी बँकेतील ही घटना आहे. बँक कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 19 जुलैची आहे. महोबातल्या कबरई भागात एका खासगी बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे कर्मचारी आपलं काम करण्यात व्यस्त होते. त्यावेळी लॅपटॉपवर काम करणारा राजेश शिंदे (वय 30) हा बँक कर्मचारी खुर्चीवर बसल्या-बसल्या बेशुद्ध झाला. बाजूला बसलेल्या सहकर्मचाऱ्याला बराच वेळ ही गोष्ट माहित नव्हती. काही वेळाने त्याने मागे वळून पाहिलं असता राजेश शिंदेने खुर्चीवर मान टाकलेली त्याने पाहिलं. त्याने मदतीसाठी बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलावलं.

एका कर्मचाऱ्याने राजेश शिंदेला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. पण यानंतरही त्याच्या तब्येतीत सुधारणा जाणवली नाही. त्यामुळे राजेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच राजेशचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. काही मिनिटांपूर्वी आपल्याशी बोलणारा राजेशच्या अचानक मृत्यूने कर्मचाऱ्यांबरोबरच त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश शिंदे हा मोहाबा जिल्ह्यातल्या बिवांर गावचा रहिवासी होता.

बँकेतल्या इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 19 जून रोजी दुपारची 12 वाजता घडली. सीसीटीव्हीत राजेश शिंदेच्या मृत्यूचा थरार कैद झाला आहे. 

व्हिडिओ व्हायरल
राजेश शिंदेच्या मृत्यूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे खुर्चीवर बसलेल्या राजेश शिंदेची तब्येत बिघडलेली दिसेतय. सुरुवातीला तो चेहऱ्यावर हात फिरवताना दिसत आहे. त्यानंतर अचानक तो मान टाकतो. राजेशची स्थिती पाहून बाजूला बसलेला कर्मचारी त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारतो. तर एक कर्मचारी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहे. 

यानंतरही राजेशच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला खाली झोपवण्यात आलं आणि त्याल सीपीआर देण्यात आला. पण राजेशचं शरीर त्याला प्रसिताद देत नव्हतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी राजेश शिंदेला उचलून रुग्णालयात दाखल केलं. तिथे तपासणीनंतर राजेशला मृत घोषित करण्यात आलं.