Taj Mahal Sunset View point : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आग्रा येथील ताजमहाल इथं दर दिवशी अनेकांचीच गर्दी पाहायला मिळते. देशविदेशातून इथं पर्यटक येतात आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असणारी ही वास्तू डोळे भरून पाहतात. आता मात्र हीच वास्तू जिथून सर्वात सुंदर दिसायची त्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. (Travel News)
येत्या काळात पुन्हा कधीच ही वास्तू पाहता येणार नाही. कारण, आग्रा येथील महताब बाग येथील ग्यारह सिढी पार्क इथून दिसणारा ताजमहालचा सुरेख नजारा इथून पुढं पर्यटकांना पाहता येणार नाहीय. एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा तुकडा यास कारणीभूत ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यानं न्यायालयात सुरू असणारा खटला जिंकल्यामुळं आता Taj Mahal Sunest View Point वर सामान्य पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसून, त्यासंदर्भातील फलक आणि भूखंडाभोवती संरक्षक कुंपणही घालण्यात आलं आहे.
मुन्ना लाल नाक स्थामिक शेतकऱ्यानं ग्यारह सीढी पार्कच्या एका भागावर हक्क सांगितला आहे. कछपुरा येथील नगला देवजीतचा मूळ रहिवासी असणारा हा शेतकरी सध्या त्याला वारसा हक्क स्वरुपात मिळालेल्या 6 बीघा अर्थात 3.749 एकर भूखंडासंदर्भातील साधारण चार दशकांपासून सुरू असणारा लढा जिंकल्या आणि ताज महालचा व्ह्यू पॉईंट बंद झाला.
निकाल येताच मुन्ना लाल या शेतकऱ्याने ट्रॅक्टरनं जमिन नांगरली, तिथं संरक्षक कुंपणही घालत सामान्य पर्यटकांसाठी इथं प्रवेश निषिद्ध असल्याचं सांगणारं जाहीर फलक लावलं. मुन्ना लालच्या माहितीनुसार त्याचे वडील आणि काका या जमिनीचे नोंदणीकृत मालक असून, 1976 मध्ये अर्बन सिलिंगदरम्यान त्यांना या भूखंडावरील हक्क गमवावा लागला होता.
1998 आणि 2020 मधील जिल्हा न्यायालयीन कागदपत्रांमध्ये असणारे पुरावे मुन्ना लालकडे जमिनीच्या मालकी हक्कांच्या हस्तांतरणाची खात्री पटवून देतात. याचविषयी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यानं, आपल्या कुटुंबानं तब्बल 40 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर या जमिनीवरील हक्क परत मिळवला आहे सांगत आपल्याकडे न्यायालयाचा आदेश आणि कायदेशीर कागदोपत्री पुरावे असल्याचंही स्पष्ट केलं. ज्यामुळं सध्याच्या घडीला ताजमहालाचं सायंप्रकाशात दिसणारं रुप पाहण्यापासून पर्यटकांना वंचित रहावं लागणार हेच स्पष्ट होत आहे.