Budget 2024 : दरवर्षी 1 फेब्रूवारीला सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थंमंत्री बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करतात. या अर्थसंकल्पामुळे कुणाला दिलासा मिळतो तर कुणावर कराचं ओझं वाढतं. पण तुम्हाला माहित आहे का ? पुर्वी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ ही ब्रिटीशांनी आखून दिलेल्या नियमावली नुसार होती. आपल्याकडे प्रत्येक घटनांना एक इतिहास असाचं काहीसा अर्थसंकल्प सादरीकराणाचा देखील इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊया अर्थसंकल्प सादरीकरणाचा रंजक इतिहास...
भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास
गेल्या काही वर्षांपासून 1फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प सादर करण्यायाठी ब्रिटीशांनी निश्चित केलेल्या वेळ आणि तारखेची परंपरा अटल बिहार वाजपेयी यांनी मोडीस काढली होती. भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास हा 150 वर्षांहून जुना आहे. 1857 च्या क्रांतीनंतर, जेव्हा ब्रिटीश सरकारने भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतला, तेव्हा भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये आला. स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प हा २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आला होता. अनेक दशकांच्या या प्रवासात अर्थसंकल्पात अनेक बदल झाले होते. ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर व्हायचा. त्यानंतर 1924 पासून फेब्रुवारीच्या 28 किंवा 29 तारखेला भारतात केंद्रीय मंत्री संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करत होते. याचं कारण म्हणजे भारतावर ब्रिटनचं राज्य होतं त्यामुळे अगोदर ब्रिटीशांचा अर्थसंकल्प सादर व्हायचा मग भारताचा अर्थसंकल्प सादर व्हायचा. ब्रिटीश भारतातून गेल्यानंतरही अर्थसंकल्पाची ही प्रथा तशीच सुरु होती. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. तत्कालीन अर्थमंत्री यांनी संध्याकाळी 5 वाजता सादर केला जाणारा अर्थसंकल्प सकाळी 11 ला सादर करुन ब्रिटीशांची प्रथा मोडली.
अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी, सकाळी 11 वाजताच का सादर होतो?
अटल बिहारी वाजपेयींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पाची वेळ ही सकाळी 11 अशी ठेवली होती. यामागचं कारण तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी असं सांगितलं की “अर्थसंकल्प सादरीकरणानंतर माध्यमांना मुलाखती देण्यासाठी किंवा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खूप वेळ जातो. संध्याकाळी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर रात्रीपर्यंत खूप उशीर व्हायचा, त्यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाची वेळ बदलणं गरजेचं होत.' यानंतर अर्थसंकल्पाचं सादरीकरण फेब्रुवारीच्या अखेरीस सकाळी 11 वाजताच सादर केलं जायचं. यानंतर मोदी सरकार आल्यानंतर अर्थसंकल्पनेत तारखेचा बदल करण्यात आला. 2017 साली तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरीस सादर न करता तो १ फेब्रुवारी रोजी सादर केला होता. तेव्हापासून आजही भारताचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रूवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री सादर करतात.
कारण भारतात आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असं आहे.मग फेब्रुवारी सुरुवातीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर करासंबंधी काही बदल करण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी फक्त एकच महिना मिळायचा. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्याच तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचं ठरवलं तसंच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेत विरोधी पक्षांना त्यावर पुरेशी चर्चा करण्यासाठी वेळही मिळावा. भारताच्या यंदाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आता अर्थसंकल्प हा पेपरलेस आणि डिजिटल झाला आहे.
आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत आणि तारखेत बदल झालेले दिसून आले तथापि, एक गोष्ट जी वर्षानुवर्षे बदलली नाही ती म्हणजे अर्थसंकल्पाचा अर्थ. अर्थसंकल्प म्हणजे सरकारची कमाई आणि खर्च यांचा लेखाजोखा.