Tiger Eating Leopard Video : अनेकांना Wild Life Video पाहिला खूप आवडतात. जंगल आणि जंगलातील प्राणी त्यांचं आयुष्य अनेक Wild Life फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. त्यातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारे हे व्हिडीओ पाहून आपल्याला घाम फुटतो. सध्या सोशल मीडिया एका दुर्मिळ व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
जंगलातील सर्वात थरार आणि रंजक व्हिडीओ असतात ते म्हणजे प्राण्यांचा शिकार करतानाचे...सिंह, वाघ आणि बिबट्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहे. पण जेव्हा वाघ बिबट्याची शिकार करतो तेव्हाचा भयानक आणि दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहताना हृदयाचे ठोके चुकतात. हे दृश्य क्वचितच कोणी पाहिलं असेल...(Wild Life Video tiger eating leopard ranthambore national park viral video on Social media trending video google trends)
जंगलात गेलो आणि वाघ दिसला नाही तर आपली जंगल सफारी असफल राहिली असो आपण म्हणतो. जेव्हा वन्यजीव छायाचित्रकार जंगलात जातो तेव्हा त्याला वाघ, सिंह आणि बिबट्याचं दर्शन झालं तर त्यांचं जीवन सफल झालं असं तो मानतो. असाच एक फोटोग्राफर जंगला गेला असता त्याचा कॅमेऱ्यात दुर्मिळ क्षण कैद झाला.
तो क्षण म्हणजे जेव्हा वाघ बिबट्याची शिकार करतो...या फोटोग्राफरने वाघाला बिबट्याला खाताना पाहिलं आणि तो क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Wild wild world. The tiger name is T 101 of Ranthambore. @HJunglebook recently captured it and want everyone to witness it. pic.twitter.com/dAT7WNvxtv
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 1, 2023
हा व्हिडीओ राजस्थानचे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानमधील आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय असे व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीव फोटोग्राफरची या जंगलाकडे विशेष ओढ असते. हा व्हिडीओ बेंगळुरूस्थित वन्यजीव छायाचित्रकार हर्षा नरसिंहमूर्ती यांनी काढला आहे. खरं तर हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. पण आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांच्या ट्विटनंतर हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
When predator becomes a prey.
Got to witness a great natural history moment as we saw this tiger feeding on a leopard at #ranthambore pic.twitter.com/cMwAq0eS3i
— Harsha Narasimhamurthy (@HJunglebook) July 14, 2022
या व्हिडीओ आणि फोटोला सोशल मीडियावर तुफान व्ह्यूज आणि रीट्वीट मिळतं आहेत. हा फोटो ट्विट करताना परवीन यांनी लिहिलं आहे, फोटोमध्ये दिसणारा वाघ हा रणथंबोरचा प्रसिद्ध वाघ T-101 आहे. वन्यजीव छायाचित्रकार हर्षा यांनी हा फोटो काढला असून तो प्रत्येकाने बघावा असा दुर्मिळ फोटो आहे. दरम्यान हर्षा यांनीही या ट्विटला रिट्विट करुन परवीन यांचे आभार मानले आहेत.