नवी दिल्ली : भारत सरकारने चिनी ऍप बॅन केल्यानंतर चीनला याचा मोठा फटका बसला. चीनमधील टिकटॉक Tiktok ऍप बॅन केल्यानंतर भारतात चिंगारी ऍपने चांगलाच जोर धरला होता. आता सरकारने इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेच्या सोशल मीडिया प्रकारात प्रथम स्थान दिले आहे. शिवाय चिंगारी ऍप विकसीत करणाऱ्या स्पर्धकाला २० लाख रूपये बक्षिस स्वरूपात देण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत भारतीय उद्योजकांनी विकसित केलेल्या २४ मोबाइल अॅप्सच्या विजेत्यांची घोषणा केली.
५९ चिनी ऍपवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच चिनी ऍपला टक्कर देण्यासाठी ४ जुलै रोजी AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge या स्पर्धेची घोषणा केली. सरकारच्या ‘MyGov’या पोर्टलवर ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती.
‘MyGov’ने दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेसाठी नऊ श्रेणींमध्ये ६ हजार ९४० ऍपचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २४ अॅपला पुरस्कार विजेते म्हणून घोषित केले गेले. प्रत्येक क्षेणीमधील विजेत्याला २० लाख रूपयांचं बक्षिस देण्यात आला असून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या स्पर्धकास अनुक्रमे १५ लाख आणि १० लाख रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.