Inspirational Story : शेतीतून चांगले उत्पन्न यावे, यासाठी शेतकरी अनेक नवनवीन शक्कल लढवत असतात. या प्रयत्नातून ते कधी अपयशी ठरतात, तर कधी यशस्वी देखील होत असतात. अशाच एका यशस्वी शेतातील प्रयोगाची (Successfull farming Story) घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि कमलम फ्रुटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील इमिलियाचट्टी येथील महिला शेतकरी वंदना सिंह बालूवा यांनी एके दिवशी आपल्या स्मार्टफोनवर यूट्यूबमधून (Youtube)कमलम फ्रुट (dragon fruit) लागवडीचा व्हिडिओ पाहिला. ही शेती पाहून त्या चांगल्याच प्रभावित झाल्या आणि त्यांनी अशाप्रकारची शेती करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्यांनी गुगलच्या माध्यमातून शेतीची माहिती घेतली. त्यानंतर उद्यान विभागाकडून शेतीसाठी सहकार्य मिळवले.
वंदना सिंह यांनी अर्ध्या एकरात कमलम फ्रुटची (dragon fruit) लागवड केली. यातून त्यांना यावर्षी 5 लाख रूपयांचा नफा झाला आहे. तसेच त्यांनी कमलम फ्रुटच्या मधोमध स्ट्रॉबेरीचीही लागवड करायला सुरुवात केली होती. आता त्यातूनही भरपूर नफा मिळत आहे.
पहिल्या व दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो, मात्र तिसऱ्या वर्षापासून या शेतीतून लाखो रूपयांचा नफा होतो. तसेच कमलम फ्रुटचं एक रोप 50 रूपयांना विकली जातं. कमलम फ्रुट (dragon fruit) शेतातून थेट वाराणसीला नेले जाते, तिथे ते 400 रूपये किलो दराने विकले जाते, असे वंदना सिंह यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. तर कमलम फ्रुट (dragon fruit) शेती करण्याची कल्पना यु्ट्यूबवरून आली असे वंदना सांगतात. तसेच कमलम फ्रुट शेती महिलांसाठी सर्वोत्तम आहे. घरातील कामे करून काही वेळ खर्च करून कमलम फ्रुटची लागवड करून महिला चांगला नफा कमावू शकतात. ड्रॅगन फ्रुटसह उर्वरीत जमिनीवर स्ट्रॉबेरी, हळद यांची लागवड केली असून त्यातूनही भरपूर नफा मिळत असल्याचे वंदना सांगतात.
दरम्यान वंदना सिंह यांची ही प्रेरणादायी कहानी अनेक महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी (Success Story) प्रेरणादायी आहे. तसेच या शेतीची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.