नांदेड : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातल्या गाड्यांसमोर युवा पँथरचे कार्यकर्ते घुसल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
विमानळावरून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना ही घटना घडली. नितीन आगे हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तात झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढला तपास रखडल्याचा आरोप करत युवा पँथरनं हे आंदोलन केलं.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत हे कार्यकर्ते चक्क ताफ्यामध्ये झेपावले. यामुळे पोलिसांचा हजगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आंदोलकांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय...