August 2024 Long Weekend Plan: पावसाळा म्हटलं की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. पण अशावेळी आड येतं ते ऑफिसचं काम. सुट्टी नसताना पावसात भिजण्याचा आनंद कसा घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. आवडीच्या जागी फिरण्यासाठी आता ऑफिसला किंवा मुलांच्या शाळांना सुट्टी घ्यावी लागणार नाही.
ऑगस्ट महिना हा लाँग विकेंडने भरलेला आहे. अवघी 1 सुट्टी घेऊन तुम्ही पाच दिवसाच्या लाँग विकेंडचा प्लान करु शकता. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. पण ते काही होताना दिसत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हा प्लान कसा करायचा आहे?
जर तुम्ही 15 ते 19 ऑगस्टपर्यंत फिरण्याचा विचार करत असाल तर हा प्लान नक्की वर्क आऊट होऊ शकतो. याकरता तुम्ही ऑफिसमध्ये 1 दिवसाची सुट्टी घेऊ शकता. आणि 5 दिवस फिरु शकता.
16 ऑगस्टला सुट्टी घेऊ शकलात तर हा तुमचा लाँग विकेंड होऊ शकतो. तो कसा जाणून घेऊया.
15 ऑगस्ट गुरुवार - सरकारी सुट्टी
16 ऑगस्ट शुक्रवार - ऑफिसला सुट्टी
17 ऑगस्ट शनिवार - विकेंड
18 ऑगस्ट रविवार - विकेंड
19 ऑगस्ट सोमवार - रक्षाबंधन
अशा पद्धतीने 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी ऑफिसला एक दिवसाची सुट्टी घेऊन तुम्ही या लाँग विकेंडचा विचार करु शकता. या लाँग विकेंडसाठी फिरण्यासाठी उत्तम पर्याय देखील आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.