Digestive Health Tips in Marathi:आपल्या आरोग्या संबंधीत कोणतीही समस्या असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी पोटापासून होते असे डॉक्टर अनेकदा आपल्याला सांगताना दिसतात. त्यात आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला मिळेल ते आणि मिळेल तेव्हा आपण खातो. यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोटात गॅसच्या समस्येचा उद्भवतात. यामुळे काय होते तर आपली पचन क्रिया बिघडते. त्यामुळे आपल्याला जर कधी कोणत्याच समस्या व्हायला नको असं तुम्हाला वाटतं तर सगळ्यात महत्त्वाची आपली पचन क्रिया ही चांगली असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा वेळी आपण कोणत्या गोष्टींचे सेवन करायला पाहिजे हे जाणून घेऊया.
पपई
पपई ही फक्त आपल्या त्वचेसाठी नाही तर आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेकारक आहे. यात असणारे पाचक एंझाइम हे पोटासाठी चांगले असतात. पपईमध्ये फायबर, कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई, ए आणि इतर अनेक खनिजे असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. जड आहार सहज पचण्याची क्षमता ही पपई हा एक रामबाण उपाय आहे.
मध-लिंबूचे सेवन
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन केल्याने पचन क्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारतात. त्याशिवाय वजनही कमी होतं. मात्र, याच्या अती सेवनानं अशक्तापणा येण्याची शक्यता देखील असते.
केळी
पचनसंस्था चांगली असायला हवी असं तुम्हाला वाटतं असेल तर नेहमी केळीचं सेवन करत रहा. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेकारक आहे.
सफरचंद
अपचन, पोटात गॅस होणं यासारख्या पचनाशी निगडित समस्या असतील तर रोजच्या आहारात सफरचंद हवंच. सफरचंदातून प्रथिनं, फायबर आणि जीवनसत्वं शरीरास मिळतात. या घटकांमुळे बध्दकोष्ठतेची समस्येपासून तुमची सुटका होते. पचन नीट होण्यासाठी सफरचंदातील गुणधर्म मदत करतात.
कलिंगड
कलिंगड तुम्हाला नेहमीच मिळेल असं नाही पण तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा कलिंगडचे सेवन करा. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात.यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)