दक्षिणेचे सुपरस्टार आणि नेते पवन कल्याण हे सध्या चर्चेत आहेत, त्यांच्या पक्षाने नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकली आहे. यासोबतच पवन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्रीही झाले आहेत. 12 जून रोजी पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपला मोठा भाऊ आणि अभिनेता चिरंजीवी यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
चित्रपटांसोबतच राजकारणातही लहरी निर्माण करणारे पवन कल्याण हे एका सुपरस्टार कुटुंबातील आहेत. पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणजे पवन कल्याण आपला मोठा भाऊ चिरंजीवीला राम मानतात. अभिनेता निवडणूक जिंकून हैदराबादला त्याच्या घरी परतला तेव्हा त्याने आपल्या मोठ्या भावाला साष्टांग नमस्कार केला.
तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर स्टेजवर उपस्थित होते. यावेळी सगळ्यांना हस्तांदोलन करुन पवन कल्याण बापासमान मोठा भाऊ असलेल्या चिरंजीवीसमोर नतमस्तक झाले आहेत. या दोन्ही घटनांमधून पवन कल्याण आणि चिरंजीवी यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळालं. या दोघांनी आपल्या कृतीतून जगासमोर एक आदर्श ठेवतात. आयुष्यात भाऊ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तो भाऊ तुमचा बंधू तर असतोच पण एक चांगला मित्र आणि बापासारखा खंबीर आधार देणारा आधार असतो.
भावांचं नातं हे अतिशय पारदर्शक असतं. मुलांमधील नातं हे कायमच अनोखं असतं. कारण या नात्यामध्ये पारदर्शकता असते. दोन बहिणी एकत्र भांडतील पण भाऊ एकमेकांशी मित्रासमान राहतात. भावाभावांच्या नात्यामध्ये एक ओढ असते. ही ओढ या दोघांमध्ये नातं घट्ट निर्माण करण्यासाठी मदत करतात.
जीवनात एक भाऊ असेल तर त्याचा खंबीर आधार असतो. भावा-भावांमधील नातं हे असंच असतं. मोठा भाऊ असेल तर लहान भावंडांना कायमच मोठा आधार वाटतो. जीवनात आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी आपली अशी एक व्यक्ती असते. आणि ती म्हणजे भाऊ. वडिलांपासून मार वाचवण्यासाठी आईपासून ओरडा वाचवण्यासाठी भाऊ अतिशय महत्त्वाचा आधार असतो.
मोठ्या भावाकडून कळत नकळत लहान भावांड बऱ्याच गोष्टी शिकत असतात. मग कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळावी तिथपासून ते आपली हौस मौज कशी करावी हे देखील मोठा भाऊ शिकवत असतो. तसेच अनेक मोठे भाऊ आपलं शिक्षण आवडी निवडी बाजूला ठेवून लहान भावांचा विचार पहिला करतात.