शर्टाचा खिसा डाव्याबाजूलाच का असतो? कारण अतिशय Interesting; 99% लोकांना हे माहितच नाही

हल्ली फॅशन म्हणून शर्ट पुरुषांप्रमाणे महिला देखील घालतात. शर्टचे डिझाइन, पॅटर्न बदलले पण शर्टाचा खिसा हा डाव्या बाजूलाच राहिला. हल्ली फॅशन म्हणून हा खिसा दोन्ही बाजूला आला. पण मुख्यत्वे तो डाव्या बाजूलाच का असतो? याचं कारण शोधलं आहे.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 22, 2025, 01:32 PM IST
शर्टाचा खिसा डाव्याबाजूलाच का असतो? कारण अतिशय Interesting; 99% लोकांना हे माहितच नाही title=

शर्टमधील खिसे फॅशनसाठी बनवले नाहीत तर त्याच्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. हातात पेन किंवा छोटी डायरी सारख्या छोट्या गोष्टी नेहमी घेऊन जाणे खूप त्रासदायक होते. किंवा खिशात पैसे राहावेत या उद्देशाने खिसे तयार करण्यात आले. पण हा खिसा डाव्या बाजूलाच का असतो. याचं उत्तर 99% लोकांना माहितच नाही. म्हणजे शर्ट आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. पण यामागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. 

खिसा डाव्या बाजूला का आहे?

शर्टचा खिसा नेहमी डाव्या बाजूला का असतो? हा एक प्रश्न आहे जो आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विचारला असेल. बहुतेक शर्टचे खिसे डाव्या बाजूला असतात, पण तुम्हाला त्यामागील कारण माहित आहे का? यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

लोकांची सोय महत्त्वाची 

बहुतेक शर्टचे खिसे डाव्या बाजूला असतात. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. लोकांच्या सोयीचा विचार करून खिसा डाव्या बाजूला ठेवण्यात आला आहे. बहुतेक लोकांना डाव्या खिशात वस्तू काढणे किंवा ठेवणे सोपे वाटते. कारण जगभरातील बहुतांश लोक हे  उजव्या हाताने काम करतात.

जे लोक उजव्या हाताचा जास्त वापर करतात त्यांच्यासाठी डाव्या बाजूला खिसा असणे अधिक सोयीचे असते. आता फॅशनमध्ये खूप बदल झाले आहेत. पूर्वी फक्त पुरुषांच्या शर्टमध्येच खिसे असायचे आणि तेही फक्त डाव्या बाजूला. महिलांच्या शर्टवर खिसे नव्हते. काळ बदलला तसतसे महिलांच्या सोयींचा विचार केला जाऊ लागला. महिलांच्या शर्टमध्येही डाव्या बाजूला खिसे असू लागले. यामागील कारण म्हणजे बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात.

शर्टच्या दोन्ही बाजूंना खिशांची फॅशन

हळूहळू हा एक ट्रेंड बनला आणि जगभरात शर्टच्या डाव्या बाजूला खिसे बनवले जाऊ लागले. फॅशन बदलू लागल्याने, काही शर्टमध्ये उजव्या बाजूला किंवा दोन्ही बाजूला खिसे असतात. फॅशनच्या दृष्टिकोनातून, डाव्या बाजूला खिसा असल्याने शर्ट अधिक आकर्षक दिसला आणि म्हणूनच तो एक ट्रेंड बनला असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, शर्टच्या डाव्या बाजूला खिसा ठेवण्याची प्रथा सुरू झाली. जी आता फॅशनचा एक भाग बनली आहे.