कोल्हापूर : शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा उपाचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता शिक्षकाला अटक केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी सानिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी इथला धक्कादायक प्रकार.
16 वर्षीय सानिका नामदेव माळी असं या विद्यार्थीनीचं नाव असून 20 फेब्रुवारीला शाळेत पाण्यातून तिला विषबाधा झाली होती. उपचाराकरता सुरूवातीला शिरोर आणि त्यानंतर कोल्हापूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी पोलिसांकडे कठोर चौकशीची मागणी केली होती. सानिकाच्या मृत्यूनंतर पालकांनी सानिकाचा मृतदेह शाळेत आणून ठेवला होता. त्यांनतर पोलीस चौकशी सुरू करण्यात आली. या तपासात शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींचा मृत्यू शाळेतील शिक्षकामुळेच झाल्याचं समोर आलं.
10 वी मध्ये शिकणाऱ्या सानिकाला शिक्षक निलेश प्रधाने यानेच कीटकनाशक आणुन दिल्याचं उघड झालं आहे. शिरोळ पोलिसांनी शिक्षक निलेश प्रधाने याला केली अटक केली आहे.
दहावीचा पेपर अवघड जाईल त्यामुळे मला आजारी पाडण्यासाठी काही औषध द्या अस सानिकाने निलेश प्रधाने यांना सांगितल्याच प्राथमिक तपासात उघड झालं आहे. नंतर शिक्षक प्रधाने यांने सानिकाला पाण्याचा बाटलीतून कीटकनाशक दिल्याचं तपासात समोर आलं आहे.