Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. पितृपक्षात सोन्याने उच्चांक दर गाठला होता. तर, नवरात्रीत सातत्याने दरात चढ-उतार होत होते. आज सोन्याच्या दरात मात्र घट झाली आहे. दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूयात आज किती आहेत सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. ही घट किंचितशी असली तरी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची घट झाली आहे. तर, प्रतितोळा सोनं 77,620 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 71,150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याचे दर 40 रुपयांनी कमी झाले असून प्रतितोळा 58220 रुपयांवर स्थिरावले आहेत.
दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळं नोव्हेंबरमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी अधिक वाढते. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आता किंमती कमी होऊ लागल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,620 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,220 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,115 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 762 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 822 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,920 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,096 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,220 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71,150 रुपये
24 कॅरेट- 77,620 रुपये
18 कॅरेट- 58,220 रुपये