शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी लावल्यामुळे अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प भरले आहेत. उदगीर तालुक्यातील तिरु नदीवरील तीरु मध्यम प्रकल्प भरभरुन वाहत आहे. या परिसरात तसेच काही प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु असल्यामुळे तीरु मध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे गुरुवारी रात्री उघडण्यात आले. या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
शुक्रवार दुपारी यातील काही दरवाजे बंद करण्यात आले. तर २ दरवाजे पुर्ण क्षमतेने आणि १ दरवाजा अर्ध्या क्षमतेने दरवाजा उघडण्यात आला आहे. सध्या नदी पात्रता पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आला आहे.
सध्या तीरु मध्यम प्रकल्प क्षेत्रात पाऊस सूरु असून पाण्याचा ओघ असाच वाढला आणखी दरवाजे उघडण्यात येतील. त्यामुळे तीरु नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे, सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहे.