मुंबई : 7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती सणाआधीच खात्यात पैसे जमा झाल्याने कर्चमाऱ्यांसाठी आनंद द्विगुणीत झाला आहे. महाराष्ट्र सरकारने ही गुडन्यूज दिली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये वेतन दिले जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचार्यांच्या भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. दुसरीकडे, अनेक राज्यांनी डीए (महागाई भत्ता) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के आहे. आता महाराष्ट्र सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि चांगली बातमी दिली आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.
महाराष्ट्र सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ( 7th Pay Commission) थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा आधीच केली होती. महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष होण्यापूर्वीच त्याची कागदपत्रे पूर्ण झाली. आता जुलै ते ऑगस्ट महिन्यात थकबाकीचा तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात येत आहे. सरकारने तिसरा हप्ता जारी केला आहे. याचे पैसे जमा होऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात 2019 मध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यानंतर, सरकारने निर्णय घेतला की 5 वर्षात आणि 2019-20 वर्षापासून पाच हप्त्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांची थकबाकी दिली जाईल. याअंतर्गत आतापर्यंत कर्मचाऱ्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. आता तिसरा हप्ता खात्यात येऊ लागला आहे. यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता अधिक शिल्लक राहील.
शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत, तुम्ही महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमचे खाते तपासा. कर्मचाऱ्यांमधील गट अ अधिकाऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गट ब अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. क या अंतर्गत गटातील लोकांना 10 ते 15 हजार रुपये आणि चौथ्या श्रेणीतील लोकांना 8 ते 10 हजार रुपये मिळतील. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्क्यांचा DA चा लाभ मिळत आहे.