Ganesh Visarjan 2023 : राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पहायला मिळत आहे. अशात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त वाहून गेले आहेत. कर्जत तालुक्यातील उल्हास नदी परिसरात ही घटना घडलेय. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कर्जत मधील उक्रुळ येथे ही घटना घडलेय. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने भक्त वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण चार जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यापैकी एक सुखरुप बचावला आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे. तर, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध सुरु आहे.
नाशिकमध्ये 4 जण बुडाले
नाशिकरोड येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागले. वालदेवी नदी पत्रात तीन जणांचा बुडून मृत्यु झाला असून त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे.सिन्नर फाटा चेहडी शिव येथील empire marvel या इमराती मधील सर्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन साठी प्रसाद सुनील दराडे हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे चेहडी येथील संगमेशर येथे गेले होते. यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण डुबून वाहून गेले तर दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे. दुपारी भविक वडनेर येथे वालदेवी नदी घाटावर गणपती विसर्जन करीत असतांना महादेव मंदिर, लहान पुला जवळ हेमंत कैलास सातपुते हा विवाहित तरुण वालदेवी नदी पत्रात बुडाला. जवान नदी पत्रात त्याचा शोध घेत आहे.पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने व रात्र झाल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन महाविद्यालय तर एक विवाहित तरुणचा मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान मुंबईतही गणेश विसर्जादरम्यान दुर्घटना घडली आहे. मुंबईत गणेश सेवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. जुहू समुद्रकिनारी ही दुर्दैवी घटना घडली. गणेश विसर्जना सोहळ्यावेळी वीज पडली आणि हा तरूण जखमी झाला. त्याला तत्काळ कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.