Vasai Leopard News: वसईकरांना सावध करणारी एक बातमी समोर येत आहे. वसई पूर्वेकडील भोईदापाडा परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे उघड आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक बाईकस्वार थोडक्यात बचावला आहे. 21 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून शाहरु खान असं या बाईकस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी वालीव पोलिस अधिक तपास करत आहेत.
बाईकस्वार शाहरुख खान घरी परतत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यानंतर शाहरुख बाईकवरुन खाली कोसळला. तेव्हा त्याने मदतीसाठी आरडा ओरडा सुरू केला. तेव्हा मदतीसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांचा आवाज एकून बिबट्याने तिथून धुम ठोकली. त्यामुळं त्याचा जीव वाचला आहे.
गावकऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर आता परिसरात बिबट्याविषयी दहशत माजली आहे. कारण जिथे बिबटा दिसला होता तो रस्ता अनेकदा गावकरी वापरतात. त्यामुळं त्यांच्या मनात भीती बसली आहे. आता बिबट्याचा वावर जाणून कुठन कुठपर्यंत आहे याचा शोध घेतला जात आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे पाहून शोध सुरू करणार आहेत.
वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या ठशांवरुन हा प्राणी बिबट्या असल्याचा अंदाज आहे. सध्या वन अधिकारी अधिक पुरावे शोधत आहेत. यामध्ये पायाचे ठसे, झाडावरील स्क्रेचेस पाहत आहेत. याचवेळी गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असं अवाहनही वनविभागाने केलं आहे.
दरम्यान एप्रिल 2024 साली वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा वावर होता. वसई पश्चिमेच्या भागात हा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक अनेक झाडं-झुडुप आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्यात आले होते. किल्ल्याच्या लागूनच नागरी वस्ती व कोळीवाडा होता. त्यामुळं बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता होती. मात्र वनविभागाने ट्रॅप लावून बिबट्याला जेरबंद केले होते.