Mira Road Murder Case : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांड (Delhi Shraddha Walkar Case) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर जंगलात फेकले. अशीच घटना आता मुंबईतील मिरा रोड येथे घडली आहे. लिव्हईनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने हत्या केली आहे. हत्या करुन त्याने मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिरारोड मधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा खून दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सरस्वती वैद्य असं मृत महिलेचे नाव आहे.
#WATCH | Maharashtra | 32-year-old woman killed by 56-year-old live-in partner | As per Police, the accused Manoj Sahni killed Saraswati Vaidya 3-4 days back and after that, he purchased a tree-cutter to chop her into pieces. Police say that the accused boiled pieces of her body… pic.twitter.com/ilFUfWVOLY
— ANI (@ANI) June 8, 2023
इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मध्ये सरस्वती वैद्य यांचा मृतदेह सापडला.
मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. मनोज सहानी (0वय 53 वर्षे) आणि मृत सरस्वती वैद्य हे दोघे या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सरस्वती यांचा मृतदेह हा छोट्या छोट्या तुकड्यात कापले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. सरवस्ती यांचा लिव्ह इन पार्टनर मनोज सहानी याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येच नेमकं कारण मात्र समजू शकलेले नाही.
नाशिकमध्ये इन्स्टावरील मैत्री एका अल्पवयीन मुलीच्या जिवावर बेतलीय. सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्रानं एका 16 वर्षीय मुलीला उंच इमारतीवर घेऊन जात फेकून दिलं. अल्पवयीन मुलगी पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत माहिती दिली. त्या माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलगी ज्या मुलाशी संवाद साधत होती त्याच मुलाने इमारतीवरून मुलीला ढकलून दिल्याची बाब समोर आली.त्यात संशयित आरोपी विनायक जाधव याला पोलिसांनी अटक केली.संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिकचा तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे.
Picture of the accused Manoj Sahni who reportedly killed his live-in partner and chopped her body into pieces, in Thane, Maharashtra https://t.co/I9OEVJCMT7 pic.twitter.com/9XBWaqY8fF
— ANI (@ANI) June 8, 2023