Aaditya Thackeray On Laadki Bahin: शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन भाजपवर टीका केली आहे. तसेच शिवोत्सव मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. शिंदे गटाच्या मेळाव्यात संगीताचा कार्यक्रमात गायक आहेत तर आमच्या मेळाव्यात नायक आहेत, आदित्य ठाकरे म्हणाले. पालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या भाजपा वाढवेल आणि कालांतराने योजना बंद होईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेवर माझं आकलन आहे त्यानुसार, ज्यांना अपात्र ठरवायचे आहेत किंवा ज्यांचे पैसे कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, अशांची यादी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर वाढेल. हे भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल. त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतील आणि नंतर ही योजना बंद करून टाकतील, असे ठाकरे म्हणाले. शिंदे गटाचे मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे असं कळालं. त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक आहेत, असे ते म्हणाले.
तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिलंय. काम तर करा, असे ते आमदार उदय सामंत यांना उद्देशून म्हणाले. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेल्या राजकारण विषाचं, फोडाफोडीचं आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदारसुद्धा फोडायच्या विचारात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.दावोस दौऱ्याबद्दल अभ्यास सुरू आहे, आम्ही त्याबद्दलसुद्धा बोलू, असे ते म्हणाले.
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणे सुरू झालं आहे का? जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का? आठवा वेतन लागू करणार आहात का ? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. त्यांना पालकमंत्री नाही मालक मंत्री त्या जिल्ह्याचं व्हायचं आहे. दादागिरीसमोर मुख्यमंत्री झुकतायत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
माझ्या मतदारसंघातील रस्त्यांचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी संदर्भातील बोर्ड लावलेले नाहीयेत. त्यामुळे या अडचणी होऊ नयेत यासाठी आम्ही आढावा घेत आहोत. रस्ते घोटाळ्यावर एसआयटी नेम आम्ही म्हटलो आहोत तो विषय वेगळा आहे त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेणार असल्याचे ते म्हणाले. रस्त्याची कामे वेगाने व्हावी पावसाळ्यापूर्वी काम व्हावेत, गणपतराव कदम मार्ग ट्रॅफिकचा हॉटस्पॉट झालाय, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी 24 तासमध्ये बांगलादेशीला पकडलं. गृहखात नेमकं कोणाला वाचवते? वाल्मीक कराडला वाचवत आहे का?संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? हा आक्रोश जनता करत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.