पिंपरी-चिंचवड : तुम्हाला कोणी फुकट सल्ला देत असेल तर त्याला थांबवा...या सल्ल्यांसाठी पैसे हवे असतील तर तुम्हाला पिंपरी-चिंचवड मध्ये कमावण्याची संधी आहे...कारण गेल्या काही दिवसात महापालिकेने सल्लागार नेमण्याचा धडाकाच लावलाय
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतले अभियंते, अधिकारी करतात काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही...त्याला कारण आहे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याचा लावलेला सपाटा... नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नेमण्यात आलेल्या सल्लागारांची ही बोलकी उदाहरण पहा...स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने शहरात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी सल्लागार नेमण्यासाठी तब्बल ७ कोटी ४५ लाख रुपये मोजून संस्थेची नेमणूक करण्यात आलीये.
त्यानंतर उड्डाणपूल असो नाही तर भुयारी मार्ग प्रत्येकासाठी जवळ पास ६ सल्लागार नेमण्यात आलेत...अगदी पेविंग ब्लॉक टाकण्यासाठी ही काही दिवसांपूर्वी सल्लागार नेमण्यात आलाय...त्यामुळे विरोधकांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केलीय... आता आयुक्तांसाठी ही सल्लागार नेमा असा टोला विरोधकांनी लागवलाय... अधिकाऱ्यांना घरी पाठवा असा टोला ही लागवलाय...
सध्या पिंपरी चिंचवड मध्ये महापौर, आयुक्त परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे प्रशासन सत्ताधाऱ्यांची यावरची भूमिका समजलेली नाही...पण एकूण परिस्थिती पाहता तुमच्या सल्ल्याच्या मार्फत पैसे कमवायचे असतील तर पिंपरी महापालिका चांगले ठिकाण आहे हे मात्र नक्की..