अलिबाग : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. समोर अथांग सागर आणि किना-यावर पर्यटकांची भरती यामुळे अलिबाग नववर्षाच्या स्वागताला सज्ज झाले आहे.
महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या पर्यटकांनी अलिबागला गर्दी केली आहे. खास झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी अलिबागच्या समुद्रकिना-याची ही ड्रोन सफर..
निळाशार समुद्र, चमचमणारे समुद्र किनारे आणि सोबतीला हिरव्या गर्द माडापोफळीच्या बागा यामुळे रंगाची अनोखी उधळण पाहायला पर्यटकांची गर्दी होतेय.
विहंगम अलिबागची सफर